42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home रोजगार/व्यापार विद्यापीठाच्या भंडारा येथील रोजगार मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद

विद्यापीठाच्या भंडारा येथील रोजगार मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद

0
48

blank

-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि जे. एम. पटेल महाविद्यालयाचे संयुक्त आयोजन
नागपूर 🙂राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २२ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोजगार मेळाव्यामध्ये ७०० विद्यार्थ्यांनी चाळणी परीक्षा तसेच मुलाखत दिली.
भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. वामन तुर्के, अधिसभा सदस्य श्री प्रथमेश फुलेकर, श्री. मनीष वंजारी, मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम, विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी डॉ. सुधाकर झळके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना व्यवस्थापन परिषद सदस्य श्री वामन तुर्के यांनी विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा या दिशेने आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या बाबत आयोजकांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्व विभागांचे, कंपन्यांचे श्री तुर्के यांनी आभार मानले. रोजगार मेळाव्याकरिता एकूण ११०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर प्रत्यक्ष सातशे विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. विविध २१ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेतली. चाळणी परीक्षेनंतर प्रत्यक्ष मुलाखत प्रक्रिया राबविण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. रोजगार मेळाव्याकरीता महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करणार आहे.

blank