41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात ४ जखमी

ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात ४ जखमी

0
204

blank

देवरी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वरील अग्रेसन भवन चौक परिसरातील राधिका हॉटेल समोर आज शुक्रवारी (1 ऑगस्ट) सकाळी 10:00 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात 60 वर्षीय सुखदास गावडकर रा. जरताळटोला या इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर टीकेश राऊत (वय 38) पिंडकेपार, निलेश वधारे (वय 37) देवरी, सुभाष बिजलेकर (वय 45) देवरी, सुरेंद्र बनसोड (वय 52) धोबीसराड, जखमी झालेल्यांची नावे आहेत. या ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भिषण अपघातात ट्रक थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या दुकानात घुसला. यामुळे परिसरात काही वेळासाठी प्रचंड गोंधळ उडाला आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली. शुक्रवारी ट्रक नागपूर कडून रायपुर कडे जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रकने रस्ता दुभागून रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर ट्रक थेट दुकानात जाऊन धडकला. यावेळी रोडच्या कडेला असलेला सुखदासला ट्रक चिरडत नेल्याने त्याचा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाला. तर दुकानात बसलेले अन्य व्यक्ती गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सदर अपघातात 2 दुचाकी व । चारचाकी वाहनाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच लोकांची एकच गर्दी घटनास्थळी जमली. अपघातग्रस्तांना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. घटनेचा तपास देवरी पोलीस करीत असून पोलिसांनी चाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.

blank