
गोंदिया,दि.१९-राज्यातील शासकीय विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यात २०२३-२४,२०२४-२५ या आर्थिक वर्षातील शासकीय कामांची जवळपास ५५० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे कंत्राटदार संघटनांनी म्हटले असून ही थकबाकी तत्काळ देण्याच्या मागणीला घेत आज १९ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले.येत्या २५ आँगस्टपर्यंत ५० टक्के थकबाकीची रक्कम न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.गोंदिया जिल्ह्यात १०००च्यावर नोंदणीकृत कंत्राटदारांची संख्या असून यात ५०० च्यावर सुशिक्षित अभियंत्याचाही समावेश आहे.
आंदोलनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फेत पाठविण्यात आले.तर जलजिवन मिशन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामाचाही निधी न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर,मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुंगनाथम,कार्यकारी अभियंता ताकसांडे यांनाही निवेदन सादर केले.या मुद्याला घेऊनच ये्त्या २५ आॅगस्ट रोजी नागपूर विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही कंत्राटदार संघटनांचे म्हणने आहे.
गोंदिया मे ठेकेदारारोने किया कलेक्टर के सामने आंदोलन मांगा बकाया बिल
जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांमधील मंजूर विकास कामे पूर्ण झाली असून मागील 2023-2024, 2024-2025 पासून आमची देयके प्रलंबित आहेत. पूर्ण झालेल्या कामाची बिल (मागणी पत्र) व इतर कागदपत्रे संबंधित विभागाकडे सादर करण्यात आले आहेत.प्रलंबित देयकांमुळे संबंधित कंत्राटदार, कामगार व संबंधित संस्था यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नविन विकासकामे अपूर्ण राहून नविन विकास कामे होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील विकास प्रक्रियेला उशीर होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.या आंदोलनात अजयजीत एम. वालिया (बॉबी),विजय अग्रवाल,शैलेष जायस्वाल, प्रणव रावत,अभिषेक जैन,प्रविण ठाकुर,आनंद ठाकूर,विनोद नाकाडे,अजय सेंंगर,सुनिल तरोणे,अनिल बिसेन,राजीव शेलके,प्रतिक कदम,प्रमानंद टेंंभुर्णीकर,प्रेमचंद खोब्रागडे,अजय टाह,सुरेश पटले,निरज ठाकूर,प्रदिप मेश्राम,प्रमोद बिसेन,पारस कटकवार,सुमित शेंडे,छन्नीलाल अगडे,युगेश बिसेन,उमेश कापसे,निरज अग्रवाल,योगेश शुक्ला,महेश अग्रवाल,संतोष भेलावे,फतेहसिंग,राजेश चौव्हान,रवी भरणे,प्रतिश गौतम,अशोक लिचडे,संजय मुरकूटे,सुधीर मानकर,दिलीप अग्रवाल,तजेंद्र छाबरा यांच्यासह अनेक कंत्राटदार आंदोलनात सहभागी झाले होते.




