40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता नांदुऱ्यात ४१ तलवारी जप्त

नांदुऱ्यात ४१ तलवारी जप्त

0
28

blank

बुलढाणा-सण, उत्सवांच्या काळातच नांदुरा येथील एका तरुणाच्या घरातून पोलिसांनी लाल म्यानमधील तब्बल ४१ तलवारी जप्त केल्या. खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई करीत आरोपीला अटक केली.
शेख वसीम शेख सलीम (वय ३३) असे आरोपीचे नाव असून, तो नांदुऱ्यातील शाहीन कॉलिनीचा रहिवासी आहे. वसीमने या तलवारी अवैध विक्रीसाठी आणल्या होत्या. याची माहिती खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपीच्या घरावर छापा मारण्यात आला. घरातून हा आरोपी एमएच-२८-बीएन-२२७७ क्रमांकाच्या दुचाकीने मोठ्या पिशवीत भरून या तलवारी घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच पाळत ठेऊन असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले.लाल म्यानमध्ये असलेल्या या तलवारींवर ‘सिरोही की सुप्रसिद्ध तलवार, सौ साल वॉरंटी’ असे कोरलेले होते.

blank