38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ देवरीत सकल ओबीसी समाजाचे एसडीओंना निवेदन

देवरीत सकल ओबीसी समाजाचे एसडीओंना निवेदन

0
53

blank

देवरी,दि.०५ः देवरी तालुका सकल ओबीसी समाजाच्यावतीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांच्या मार्फेत मुख्यमंत्र्याच्या नावे असलेले निवेदन ४ सप्टेंबरला सादर करुन ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २ सप्टेंबर रोजी काढलेला सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या जीआरनुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत काढलेला निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे. तसेच पुन्हा सरकारने सगेसोयरेंच्या माध्यमातून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचे काम करीत आहे. तो शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी देवरी तालुका सकल ओबीसी समाजाचे प्रतिनिधी आर.एस.गायधने, प्रभाकर दोनोडे, युगेशकुमार बिसेन,चंद्रकुमार बहेकार,राजेश भुते,ज्योतिबा धरमशहारे,संतोष भुते,रघुराम वाडीभस्मे,गजानन शिवणकर,कृष्णा ब्राम्हणकर,झेड.बी.दोनोडे,रामकिशन उईके

blank