34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home रोजगार/व्यापार जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

0
41

blank

 गोंदिया, दि.8 : जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून 23 वय वर्षाखालील तरुण-तरुणींसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिंपीक खेळासारखी आहे. सदर स्पर्धा 2026 मध्ये शांघाय येथे होणार आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा-2026 साठी इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी दि.30 सप्टेंबर 2025 पर्यंत https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देवून आपली नोंदणी करावी.

         अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं.210, गोंदिया येथे प्रत्यक्ष अथवा 07182-299150 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त रा.ना.माटे यांनी केले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2024 किंवा तद्नंतरचा असणे आवश्यक आहे.

         या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य व देशपातळीवर करुन निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. त्यानुषंगाने 2026 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्य स्तरावर व्ययसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौंसिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

blank