41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home रोजगार/व्यापार सालेकसा येथे 25 सप्टेंबरला जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

सालेकसा येथे 25 सप्टेंबरला जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
33

blank

गोंदिया, दि.22 : जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया व शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सालेकसा येथे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये 8 कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार असून 250 रिक्त जागांवर भरती करणार आहेत.
इयत्ता 10 वी 12 वी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची छायांकीत प्रमाणपत्रे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्डसोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया येथील दूरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर किंवा [email protected] या ई-मेल आडीवर संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रा.ना.माटे, यांनी केले आहे.

blank