
गोंदिया,दि.२५ः राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नागरिक सेलची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, वरिष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष टी.एम.पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये व संघटनात्मक बांधणीमध्ये जेष्ठ नागरिकांनी सक्रिय भूमिका महत्त्वाची आहे असे विचार अनेकांनी मांडले.
बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना राजेंद्र जैन म्हणाले की, जेष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ असून कुटुंब तसेच समाजाच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या अनुभवातून नवीन पिढीला योग्य दिशा मिळते. समाज त्यांच्याकडे आदराने व सन्मानाने पाहतो. त्यामुळे त्यांच्या विचारांची व मार्गदर्शनाची आपापले अनुभव, विचाराची देवाण घेवाण झाल्यास पक्षाच्या पुढील वाटचालीस निश्चितच मोठा लाभ होईल.
बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, टि.एम.पटले, रमेश गौतम, माधुरी नासरे, अशोक सहारे, अविनाश काशिवार, थानसिंग हरिनखेडे, डी.जी.रहांगडाले, झनकलाल ढेकवार, ए.एम.जैतवार, योगेंद्र जैतवार, हरीश उके, लक्ष्मण गुडघे, संजय बैतूले, रामलाल बिसेन, डि.जी कोल्हारे, एफ.सी पटले, रुपचंद कटरे, रामेश्वर हरिनखेडे, दिगम्बर लाडे, रामेश्वर बुडेकर, चित्रीवजी, धनलाल जैतवार, चांदोराव बिसेन, प्रशांत पानसे, टी.एम.धुवारे, आर.डी.पटले, अमरदास डहाके, अजबराव रहांगडाले, गोपाल चावके, चुन्नीलाल शहारे सहित जिल्ह्यातील वरिष्ठ नागरिक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.




