
भंडारा,दि.5-पोलीस बाॅईज संघटन भंडाराच्या वतीने मुंबई वाहतुक पोलीस कांस्टेबल विलास शिंदे आणि तुमसर पोलीस स्टेशनचे गुप्त शाखेचे पोलीस शिपाई राजु साठवणे या दोघांना झालेल्या मारहाण प्रकरणातील गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यानावाने जिल्हाधिकारी भंडारा मार्फेत पाठविण्यात आले.पोलीस देशाच्या, समाजाचा अहोरात्र रक्ताचे पाणी करून रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत असतांना जर असेच अत्याचार व त्यांच्यापरिवारावर अन्याय केला जात पोलीस कर्मचारी यांचे कुटुंब असुरक्षित राहणार आणि त्यांनी कुणाकडे रक्षणाची मागणी करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी तुषार हटेवार, पंकज ठवकर, लक्ष्मीकांत भलावी, शशांक शेळके, शुभम मते, नमित सयाम, रजत कटरे, शुभम कटरे, सागर मते, शुभम मंदुरकर, शुभम आदमने, भारत चौधरी, सागर कुंभारे, तुषार सुरंकर, सचिन बावने व जिल्हय़ातील इतर पोलीस बाॅईज मोठ्या संख्येने उपस्थित होते.