35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home क्रीडा इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी विद्यापीठाची चमू रवाना

इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी विद्यापीठाची चमू रवाना

0
23

blank

-विविध २८ स्पर्धांमध्ये विद्यापीठातील ३६ विद्यार्थी होणार सहभागी
नागपूर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची चमू रवाना झाली आहे. कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचा संघ जळगाव करिता रवाना झाला. इंद्रधनुष्य स्पर्धेत विविध कला प्रकारातील स्पर्धांमध्ये विद्यापीठातील ३६ विद्यार्थी सहभागी होणार आहे.
महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ, ललित कला विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात, सांस्कृतिक समन्वयक श्री प्रकाश शुक्ला यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. इंद्रधनुष्य स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांमध्ये सुजल अनिल साखरे, प्रथमेश प्रकाश अकुलवार, छकुली कैलास जाधव, प्रसून चरणदास शामकुळे, इरा मंगेश पाठक, निहार पल्लवी तांबे, प्राची विनोद व्यवहारे, चेतना शंकर माथनवार, युगलहंस जगदीश मरकाम, मोहित मंतू सरकार, लीलाधर संतोष खुराणा, सराह सैफ अली खान, मोहिनी यशवंत वनकर, सेजल विनोद नगराळे, स्नेहा महादेव सिडाम, हिमाक्षी राजेश गेडाम, स्वराश्री गजानन केतकर, शुभ्रज्योती देवराज मल्लिक, इंद्राणी मिलिंद इंदूरकर, सुशांत रवींद्र पाटील, निर्मल विशाल गायकवाड, अंकित दिगंबर भांडारकर, शैलेश चैनू नैताम, सुयोग विलास देवळकर, उदय दत्तात्रय गुल्हाने, वेदांत राजेश खाजबागे, अभिषेक सरिता कुमार, सायली अशोक गडकरी, ऐश्वर्या शाम पारवेकर, यामिनी श्याम जनगाडे, भूमिका पांडुरंग जापूलकर, आदित्य राजेंद्र प्रधान, श्रुती रावजी तुलावी, प्रिया हिरामण आवारी, जिया जावेद कुरेशी यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक तसेच सहकार्यांमध्ये डॉ. संयुक्ता थोरात, सर्वश्री प्रकाश शुक्ला, अरविंद कोटे, स्वप्निल खरे, नितीन विनोद मरसकोल्हे, वीर मनीष खोटे, चिराग दीपक शुक्ला, जय नितीन गाला, सुजल अनिल साखरे, अक्षत त्र्यंबकेश्वर जाधव, शंतनु सुरेश पिसे, सुशांत रवींद्र पाटील, जोश मनीष लाल, सुयोग विलास देवळकर, आदित्य राजेंद्र प्रधान, प्रिया हिरामण आवारी, यशोधन प्रसाद देशपांडे यांचा समावेश आहे.

blank