41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home महाराष्ट्र ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात झाली मोठी वाढ

‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात झाली मोठी वाढ

0
283

blank

महाराष्ट्रातील काही शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. एका महत्वपूर्ण शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात शासनाकडून वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता आचारसंहिता लागू झाली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याआधीच राज्य मंत्रिमंडळाकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

आरोग्य विभागातील काही फ्रंट लाईन वर्कर च्या मानधनात वाढ करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या विस्तारीत योजनेसाठी सरकारने काही फ्रंट लाईन वर्कर्स नियुक्त केले होते.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्माण करणे- व वितरण करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार केवायसी केलेल्या कार्डामागे 20 रुपये आणि कार्ड वितरणासाठी 10 रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी राज्याने 204 कोटी 6 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता दिली आहे.
विस्तारित योजनेत राज्यातील 12 कोटी 74 लाख लाभार्थ्यांपैकी 3 कोटी 44 लाख लाभार्थ्यांची आयुष्यमान कार्ड तयार करण्यात आले असून उर्वरित 9 कोटी 30 लाख कार्ड तयार करण्यात येणार आहेत. हे उद्दिष्टये 100 टक्के साध्य करण्यासाठी राज्यातील आशा कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानचालक व आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दर कार्डामागे असे वाढीव मानधन देण्यात येणार आहेत.

blank