41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता ८ हजाराची लाच घेतांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

८ हजाराची लाच घेतांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

0
209

blank

अकोला,दि.०७ः येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपीक असलेल्या महिला कर्मचारी ममता संजय पाटील,वय ५०र्षे,पद वरिष्ठ लिपीक वर्ग ३,ह.मु. गिता नगर, तीन बंगला जवळ, तोळकर यांच्या घरी भाडयाने अकोला, मुळ पत्ता वृंदावन नगर, चिखली रोड, बुलडाणा यांना ८ हजाराची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तकारदार हे धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचेकडे कमिशन पद्धतीने काम करणारा कैलास ओमप्रकाश अग्रवाल यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये तक्रारदार यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या वेअर हाउस मधील धान्य विकुन तक्रारदाराची फसवणूक केली होती. त्यावरून पो.स्टे. रामदास पेठ, अकोला येथे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन रामदास पेठ तसेच गुन्हे शाखा अकोला यांचेकडे असुन सदर गुन्ह्यात तपासी अधिका-यांनी आरोपी कैलास अग्रवाल यांना मदत केल्यामुळे त्यांना जामीन मिळाला. असे तक्रारदाराचे म्हणणे होते. त्यामुळे तक्रारदार यांनी सदर गुन्ह्यातील तपासी अधिका-यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी. अशा आशयाचा तक्रार अर्ज पोलीस अधीक्षक, कार्यालय अकोला येथे दिला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, अकोला यांचे आदेशावरुन अपर पोलीस अधीक्षक अकोला यांनी चौकशी करुन अहवाल पोलीस अधीक्षक, कार्यालय अकोला येथे पाठविला. सदर अहवालावर नोटशीट तयार करुन वरिष्ठांना सादर करण्यासाठी वरिष्ठ लिपीक श्रीमती ममता संजय पाटील, नेमणुक आस्थापना विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय,अकोला यांनी तक्रारदार यांना २०,००० रुपये लाचेची मागणी करुन नोटशीट सादर करण्यापुर्वी १०,००० रुपये व  नोटशीट सदर केल्यावर १०००० रुपये दयावे लागतील अशी लाचेची मागणी केल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती कार्यालय येथे दिली होती.

तक्रारदाराच्या सदर तक्रारीवर कारवाई करण्यासाठी एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दि.०६ नोव्हेंबर रोजी सत्यता पडताळणी कारवाई केली असता तकारदारांच्या अर्जानुसार अपर पोलीस अधीक्षक, अकोला यानी दिलेला अहवाल पोलीस अधीक्षक, कार्यालय अकोला येथे पाठविला आहे. सदर अहवालावर नोटशिट सादर करण्यापुर्वी ममता संजय पाटील, वरीष्ठ लिपीक, यांनी तक्रारदार यांना तडजोडीअंती ८,००० रुपये  लाचेची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केल्याने लगेच लावण्यात  आलेल्या सापळ्यात पंचासमक्ष तक्रारदारा कडून लाचेची रक्कम स्विकारतांना सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान ममता सजय पाटील, वरिष्ठ लिपीक यांस रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.पोलीस अधीक्षक कार्यालयातील लाचखोर महिला कर्मचाऱ्याविरुद्ध पो.स्टे. खदान, अकोला येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती येथील उपअधीक्षक सुनिल किनगे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती चित्रा मेसरे, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलीस हवालदार राहुल वंजारी, प्रमोद रायपुरे, पोकॉ. शैलेश कडू, चालक पोउपनि. सतिश किटूकले यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

blank