
पीटीआय
रिओ दी जानिरो- ब्राझीलची राजधानी रिओ दी जानिरोमध्ये झालेल्या पंगूंच्या ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले. मात्र त्याच ठिकाणी सुरू असलेल्या अपंगाच्या ऑलिंपिकमध्ये (पॅरालिंपिक) मरियप्पन थांगावेलूने ही कसर भरून काढली. त्याने पुरुषांच्या टी ४२ प्रकारात १.८९ मीटर उंच उडी घेत सुवर्णपदकाची कमाई केली. याच प्रकारात वरुण सिंग भाटी तिसरा आला. त्याला कांस्यपदक मिळाले. मरियप्पन हा उजव्या तसेच वरुण हा डाव्या पायाने अधून आहे.
पॅरालिंपिकमध्ये एका प्रकारात दोन पदके मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. सुवर्ण आणि कांस्यपदक मिळवलेल्या थांगावेलू आणि भाटीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, महानायक अमिताभ बच्चन, क्रीडामंत्री विजय गोयल, रिओमधील कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक, ऑलिंपिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग, ऑलिंपिक पदकविजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम, केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजुजू तसेच भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचा (बीसीसीआय) समावेश आहे.