34.5 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पी.एम.श्री योजनेतील निधी अनियमिततेबाबत माजी मुख्याध्यापकांवर चौकशी;जि.प.सदस्य सौ.अश्विनी रविकुमार पटले

पी.एम.श्री योजनेतील निधी अनियमिततेबाबत माजी मुख्याध्यापकांवर चौकशी;जि.प.सदस्य सौ.अश्विनी रविकुमार पटले

0
176

एकोडी /गोंदिया – पी.एम.श्री जिल्हा परिषद भारतीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, एकोडी येथे कार्यरत असताना माजी मुख्याध्यापक पी. एम. खडसे यांनी पी.एम.श्री योजनेत तसेच शाळेस प्राप्त इतर विकास योजनांच्या निधीच्या वापरात अनेक अनियमितता केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

या अनियमिततेसंदर्भात आलेल्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सौ. अश्विनी रविकुमार पटले यांनी दिली.

मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी समितीला सर्व संबंधित कागदपत्रांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, समितीकडून प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार माजी मुख्याध्यापक पी. एम. खडसे यांच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.सौ.अश्विनी पटले यांनी सांगितले की,“मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित सर्व रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल. शाळा समिती, व्यवस्थापन समिती, पालकवर्ग आणि ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी चौकशी पारदर्शकपणे व प्रामाणिकपणे केली जाईल.”

तक्रार नोंदविल्यानंतर लगेच दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणे आणि त्याच काळात शिक्षणाधिकाऱ्यांची बदली होणे यामुळे चौकशी प्रक्रियेत सुमारे एक महिन्याचा विलंब झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पी.एम.श्री योजनेत मुख्याध्यापकांना सिंगल डिजिटल सहीने निधी काढण्याचा अधिकार असल्याने अनेक ठिकाणी तक्रारी वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याबाबत प्रशासनाने योग्य सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच, पी.एम.श्री योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीच्या खर्चाचे अधिकार आणि नियंत्रण शाळा व्यवस्थापन समितीकडे (SMC) असल्याने, पालक प्रतिनिधींनीही निधी वापरावर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे आवाहन सौ. पटले यांनी केले. काही शंका किंवा अडचण आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्वरित तक्रार करावी, असेही त्यांनी सांगितले.

गावातील पालक व नागरिकांनी चौकशीसाठी प्रशासनास सहकार्य करावे, आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर निश्चितच कार्यवाही करून न्याय मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.आपल्या शाळेला अशा कितीही अडचणी आल्या तरी आपण यात शाळेचा विकास व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार व सर्वांनी यासाठी मदत करावी हीच अपेक्षा