
सेविका व मदतनीसवर कारवाई होणार
पुणे,दि.२७ः पुण्यामध्ये 20 मूलांना अंगणवाडीत कोंडल्याचा प्रकार झाला आहे ,तर याकारणावरून सेविका व मदतनीसवर कारवाई होणार आहे असे मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांनी म्हटले आहे. पुण्यातील हिंजवडीत धक्कादायक प्रकार घडला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी 20 लहान मूलांना अंगणवाडीत कुलुप लावुन कोंडुन या सेविका बैठकीला पोहोचल्या होत्या. इकडं लहान मुले बाहेर येण्यासाठी आरडाओरडा करत होती.
हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रराक्रम केला आहे.पुणे शहरातील आयटीपार्क हिंजवडीत धक्कादायक घटना घडली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मिळून 20 लहान मुलांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रताप समोर आला आहे. अंगणवाडीला कुलुप लावुन गेल्यामूळे लहान मुलं अक्षरशः रडत असल्याचं दिसून आले आहे. हे पाहून त्या भागातील लहान मुलांच्या पालकांनी व आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक 3 च्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा पराक्रम केला आहे. अंगणवाडीतील ंलहान मुलांना अशा पध्दतीने अंगणवाडीत कोंडून जाणे धोकादायक आहे.
ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावले, म्हणून आम्ही लहान मुलांना अंगणवाडीत आत ठेवून अंगवाडीला कुलूप लावला, असा धक्कादायक खुलासा या दोघींनीही केला आहे. काल बुधवारी, ता. 26 सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. उपस्थितांनी ही बाब मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना कल्पना दिली, तेव्हा गिराम यांनी शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून तातडीने अंगणवाडीचं कुलूप खोलण्याचे आदेश दिले. काही वेळासाठी का असेना असे लहाना मूलांना अंगणवाडीत कोंडून जाणे, हे किती धोकादायक आणि संतापजनक आहे. हे मुलांच्या आक्रोशावरून स्पष्ट झाले आहे. आता मुळशी बाल विकास प्रकल्प अधिकारी काय कारवाई करतात हे महत्वाचे असेल.
लहान मुलांना अगदी काही काळासाठीसुद्धा अशा प्रकारे बंदिस्त करून ठेवणे किती घातक आणि धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय मुलांच्या रडण्याच्या आवाजातून स्पष्टपणे आला आहे. या गंभीर निष्काळजीपणावर आता बाल विकास प्रकल्प अधिकारी कोणती कार्यवाही करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेनंतर अंगणवाडीतील लहान मुलांच्या पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.





