33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राष्ट्रीय महापुरुषांच्या विचारांना उजाळा देत ऑल इंडिया सिद्धार्थ वेल्फेअर सेंटरचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम...

महापुरुषांच्या विचारांना उजाळा देत ऑल इंडिया सिद्धार्थ वेल्फेअर सेंटरचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम उत्साहात

0
18

blank

दिल्ली,  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, झाशी ची राणी, माँ. जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, रमाबाई आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, यांच्या कार्याचा उजाळा देत ऑल इंडिया सिद्धार्थ वेल्फेअर सेंटरचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

ऑल इंडिया सिद्धार्थ वेल्फेअर सेंटरच्या नेहमीचा कार्यक्रम महाराष्ट्र रंगायन येथील सभागृहात रविवारी पार पडला या कार्यक्रमास डॉ हेमंत तिरपुडे प्रोविडेंट फंड कमिश्नर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.स्नेह मिलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र रंगायनाचा परिसर फूलांनी आणि रांगोळीने सजविला होता. संस्थेचे सदस्य सर्वच नटून थटून कार्यक्रमासाठी आले. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध सदस्यांचे चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनाने झाली त्यानंतर फॅन्सी ड्रेस स्पर्धा झाली यात महापुरुषांची वेशभूषा धारण करून त्यांनी दिलेला संदेश पोहोचविण्याचा इमानदारीने प्रयत्न सहभागी सदस्य कलाकारांनी केला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर तिरपुडे यांनी आपल्या मनोगतात शाहू, फुले, आंबेडकर यांनी सामाजिक समता समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला हीच समता अधिकाधिक भारतीयांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही संस्थेतील सदस्यांची असून आपापल्या स्तरावर तसेच संघटित रूपात पार पडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दुपारनंतर सुप्रसिद्ध शाहीर अनिरुद्ध शेवाळे यांचा आंबेडकरी जलसा झाला. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीयांवर असलेले ऋण कधीही फेडू शकणार नाही. असा संदेश त्यांनी या जलशातून दिला.या कार्यक्रमात लहान मुलांसाठी क्रीडा आणि चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आली होती. संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली याच्या निमित्ताने संविधानावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा पण घेण्यात आली होती.
दहावी बारावी मध्ये गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि निमगडे शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात वेगवेगळ्या भागात सहभागी सदस्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित. करण्यात आले. यावेळी संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुजाता अंभोरे उपाध्यक्ष सुजाता नंदेश्वर महासचिव सुभाष लोखंडे ,कोषाध्यक्ष ज्योत्स्ना वासनिक शेखर अलोने, एडवोकेट शरद शिंगाडे, मनीष गवई, अभय गणवीर, प्रमोद थुलकर मनोज सहारे आणि अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.

blank