35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home क्रीडा खेळ व शिक्षणाच्या बळावर आयुष्य घडते — आमदार राजकुमार बडोले

खेळ व शिक्षणाच्या बळावर आयुष्य घडते — आमदार राजकुमार बडोले

0
53

blank

अर्जुनी-मोरगाव: (१६ डिसेंबर ) अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित अर्जुनी-मोरगाव तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.

उद्घाटनप्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या तालीम, मेहनत आणि आवडीचा योग्य वेळी अभ्यास करून त्या त्या क्षेत्रात कार्यरत व्हावे. संघर्षाच्या काळाशी तडजोड करत आधुनिक युगात उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांचा योग्य उपयोग करून शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय व नावलौकिक मिळवावा. मनातील प्रबळ इच्छाशक्तीमुळे कोणतेही कार्य यशस्वीरीत्या पूर्णत्वास जाते. खेळ व शिक्षण या दोन्ही माध्यमांतून आयुष्याला नवी दिशा मिळू शकते असे प्रतिपादन केले.

यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते, पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट, जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते, माजी सभापती सविता कोडापे, पंचायत समिती सदस्य प्रमोद लांडगे, नुतन सोनवाने, भाग्यश्री सयाम, कुंदा लोगडे, पुष्पलता दृगकर, जल व्यवस्थापन समितीचे निमंत्रित सदस्य रामदास कोहाडकर, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, विस्तार अधिकारी बी. डब्ल्यू. भानारकर पं. स. अर्जुनी, प्रभाकर कोवे सरपंच महागांव, सुरेश पुस्तोडे उपसरपंच महागांव, आर. के. देशमुख, विनोद डोंगरवार, तंटामुक्ती अध्यक्ष शिवरामजी बोरकर, हंसराज गोटेफोडे, भागवत झोडे, लक्ष्मीकांत नाकाडे सरपंच माहूरकुडा, नाकुक लसुंते यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank