
अर्जुनी-मोर.– अर्जुनी-मोर.तालुकास्तरीय अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत महागाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमास तालुक्यातील विविध मान्यवर, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवामध्ये विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असून या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
महोत्सवात कबड्डी, खो-खो, धावणे, लांबउडी, सांस्कृतिक नृत्य, गायन, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजयी संघ व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास पोर्णिमा ढेंगे (सभापती महिला व बालकल्याण), आम्रपाली डोंगरवार (सभापती पंचायत समिती), जयश्री देशमुख (जिल्हा परिषद सदस्य), संदिप कापगते (उपसभापती पंचायत समिती), कविता कापगते (जि. प. सदस्य), सविता कोडापे, भाग्यश्री सयाम, कुंदा लोगडे, नाजुक कुंभरे, नुतन सोनवाने, प्रमोद लांडगे (पंचायत समिती सदस्य), कोवेजी (सरपंच महागाव), चंद्रभान पुस्तोडे (उपसरपंच), एल. एस. कुटे (विस्तार अधिकारी), आर. के. देशमुख, रामदास कोहाडकर (माजी जि. प. सदस्य), गुरुदेव उपरीकर (माजी सरपंच), अभिषेक सिंह पवार, हंसराज गोटेफोडे (पो. पा.), सोनालेजी, अनिल देशमुख, छगन साखरे, ईश्वर आत्राम (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती), मनोहर बडवाईक, गोविंद वाघाडे, सुनील शहारे, सुभाष बागडे (गटशिक्षणाधिकारी), प्रमुख भानारकर (विस्तार अधिकारी), नाजुक लंजे (विस्तार अधिकारी), मेश्राम सर, केंद्रप्रमुख गायकवाड सर, कुंभरे सर, आर. के. डोंगरवार, हंसराज मेश्राम, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात लायकराम भेंडारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण होतो. शिक्षणासोबतच क्रीडा व संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे. अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या गुणविकासासाठी एक प्रभावी मंच असून भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवर्ग, पंचायत समिती कर्मचारी, स्वयंसेवक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले





