34.5 C
Gondiā
Wednesday, June 3, 2026
Home विदर्भ हनुमंत कथेला मुख्यमंत्री फडणवीस व महसुलमंत्री बावनकुळेंनी लावली उपस्थिती

हनुमंत कथेला मुख्यमंत्री फडणवीस व महसुलमंत्री बावनकुळेंनी लावली उपस्थिती

0
109

गोंदिया,दि.२२ः- येथील डी. बी. सायन्स महाविद्यालयात परमपूज्य सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या अमृतवाणीतून भव्य हनुमंत कथा महोत्सवाचे आयोजन(दि.२१)रविवारपासून करण्यात आले आहे. महोत्सवाच्या द्वितीय दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. या पावन प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे,जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर,आमदार विनोद अग्रवाल,डाॅ.परिणय फुके,राजु कारेमोरे, भाजप जिल्हाध्यक्ष सीता रहागंडाले यांनी उपस्थिती दर्शवत हनुमंत कथेचे श्रद्धापूर्वक श्रवण केले. या पावन कथेच्या माध्यमातून श्रद्धा, सेवा व संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित होत संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.यावेळी आयोजक खासदार प्रफुल पटेल,वर्षा पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.