33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home मराठवाडा/खान्देश बीडमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून, एका ऊसतोड कामगाराचा मृत्यू

बीडमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून, एका ऊसतोड कामगाराचा मृत्यू

0
37

blank

बीड/वृत्तसेवा-बीडमधील एका ऊसतोड कामगाराच्या अंगावरुन ट्रॅक्टरची टॉली गेल्याने, रीलस्टार गणेश डोंगरे यांचा, जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऊस वाहतुक करत असताना या भीषण अपघातात कुटुंबाचा कर्ता पुरुष गेला आहे. मयत गणेश डोंगरे हा सोशल मीडियावरील रीलस्टार होता. त्याची पत्नी फेसबुक लाईव्ह करत असतानाच तिच्या डोळयादेखत हा अपघात घडला आहे.
उसाच्या हंगामात येथील लाखो कुटुंबे, उदरनिर्वाहासाठी राज्याच्या विविध भागांत तसेच, परराज्यात ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी सोन्नाखोटा येथील ,रहिवासी गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी हेही पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणीसाठी बाहेर पडले होते. गणेश डोंगरे हे पत्नी आणि 3 चिमुकल्या मुलींसह ऊसतोडणीसाठी गेले होते. मात्र, ऊस वाहतुक करताना झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली त्यांच्या अंगावरून गेल्याने गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि 3 चिमुकल्या मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील गणेश डोंगरे यांच्याकडे केवळ 1 एकर जमीन होती. वृद्ध आई-वडील असल्याने संपूर्ण जबाबदारी गणेश यांच्यावर होती. पत्नी अश्विनी, 3 मुलींचे पालनपोषण, आई-वडिलांची जबाबदारी आणि वाढता खर्च यामुळे गावाकडील उत्पन्न अपुरे पडत होते. या कुटुंबाला आर्थिक परिस्थितीशी झुंज द्यावी लागत होती. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी गणेश आणि अश्विनी यांनी ट्रॅक्टरद्वारे ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांपासून हे दाम्पत्य महाराष्ट्राच्या कानाकोपरयात जाऊन ऊसतोडणीचे काम करत होते.
यावर्षी ते लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आपल्या चिमुकल्या मुलींसह ऊसतोडणी करत होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन ते साखर कारखान्यावर माप होण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. याच वेळी जवळून जाणाऱया दुसऱया ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक गणेश यांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात गणेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी 1 कामगार जखमी झाला. काही क्षणांतच ही घटनासोशल मीडियाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात पसरली आहे.

blank