वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू

0
20

भंडारा : जंगलातून भटकलेल्या एका हरीणाचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास भंडारा-रामटेक मार्गावरील खुर्शीपार-टवेपारनजीक घडली.

माहितीनुसार, भंडारा-रामटेक मार्गावरील खुर्शीपार हा परिसर जंगलाला लागून आहे. या मार्गाने पियुष घाटोळे हा तरूण दुचाकीने खातकडे जात होता. काही अंतरावर त्यांना मोठा आवाज आला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले असता खुर्शीपार मार्गावर एक हिरन तडफडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी या हरीणाला पाणी पाजले. जखमा जास्त असल्यामुळे या हरीणाचे तडफडणे बंद झाले नव्हते. काही वेळातच या हरीणाचा मृत्यू झाला. याची माहिती त्यांनी भंडारा वनविभागाला दिली. माहिती मिळाल्यानंतर वनकर्मचारी गौरी नेवारे हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या मृत हरीणाला घेऊन गेले. त्यानंतर पशुवैद्यकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह पुरण्यात आला.