36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home क्रीडा राष्ट्रीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या पूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

राष्ट्रीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या पूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

0
36

blank

परभणी, दि. 13 : राष्ट्रीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा (19 वर्षांखालील मुली) करिता महाराष्ट्र राज्य संघाच्या पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या वतीने दि. 12 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, येथील इंडोअर हॉलमध्ये करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सचिव शितल सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिबिराच्या प्रशिक्षिका तथा जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे उपस्थित होत्या. मार्गदर्शन करताना शितल सोनटक्के यांनी सांगितले की, खेळाडूंनी आपले जीवन खेळाडूवृत्तीने जगले पाहिजे. प्रशिक्षकांनी दिलेल्या तांत्रिक, शारीरिक व मानसिक मार्गदर्शनाचे मनोयोगाने पालन केल्यास यश निश्चितच प्राप्त होते. सांघिक भावना व एकमेकांवरील विश्वासातून केलेल्या प्रयत्नांना यशाची पायरी गाठल्याशिवाय कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.
तसेच ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीने प्रशिक्षण कालावधीत सर्व खेळाडूंना दररोज सकाळी फळे, नाश्ता व अंडी उपलब्ध करून देण्याची सामाजिक जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. परभणी येथील बँक ऑफ बडोदा, वसमत रोड शाखेच्या वतीने खेळाडूंना टी-शर्ट, स्पोर्ट्स किट, बॅग व वॉटर बॉटल यांचे प्रायोजकत्व मिळाले असून तायक्वांदो (14 वर्षांखालील मुली) तसेच कबड्डी (19 वर्षांखालील मुले व मुली) या खेळांसाठी साहित्य वाटप करण्यात आले.
हिमाचल प्रदेशातील नालागड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी प्रशिक्षिका गीता साखरे संघासोबत जाणार असून संघ व्यवस्थापक म्हणून आंतरराष्ट्रीय योगा खेळाडू वंदना कोरडे काम पाहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता साखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश पंडित यांनी केले. प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी धीरज नाईकवाडे व आशिष परदेशी यांनी परिश्रम घेतले.

blank