29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ वृक्षसेवक पुरस्काराने कैलास व्यास सन्मानित

वृक्षसेवक पुरस्काराने कैलास व्यास सन्मानित

0
40

blank

तिरोडा –येथील गजानन वाटीकेचे प्रबंधक कैलास व्यास यांना सेवाग्राम येथे झालेल्या एका कार्यक्रमात वृक्षसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वृक्षवेल साहित्य मंच महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने सेवाग्राम आश्रमात राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात राज्यातील २७ जिल्ह्यातील प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिंतामण कोंगरे व उद्घाटक म्हणुन नगराध्यक्ष सुधीर पांगुळ उपस्थित होते.
या संमेलनात वृक्ष लागवड व संवर्धन क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कैलास व्यास यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना वृक्षसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कैलास व्यास यांना या पूर्वी सुद्धा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.किशोर मलेवार, संजय येरने, नरेंद्र पोद्दार , योगेश तांदूळकर, विपीन मोघे इतरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.