
गोंदिया,दि.१३ः तालुक्यातील : माळयादेव बाबा, शिव मंदिर, तांडा येथे उद्या १४ फेबुवारीला महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने महिला प्रोढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.दिप प्रज्वलक म्हणून सौ.सिताताई रहांगडाले, अध्यक्ष भाजपा जिल्हा गोदिया, प्रमुख अतिथी म्हणुन डॉ.लक्ष्मण भगत (सभापती अर्थ व बांधकाम जि. प. गोंदिया),दिपाताई चंद्रीकापुरे (सभापती कृ. व पशु संवर्धन जि.प. गोंदिया),दुर्गाजी ठाकरे (संचालक, जि.
डी.सी.सी. बँक, गोंदिया),केतन तुरकर (संचालक, जि. डी. सी.सी. बँक गोंदिया),पंकज यादव (संचालक, जि.डी. सी. सी. बँक. गोंदिया),ममताताई वाढवे (जि.प. सदस्य, खमारी क्षेत्र),जगदीश बहेकार (माजी सभापती जि.प. गोंदिया),वर्षाताई पटले (सरपंच, ग्रा.पं. तांडा),विलेश्वर कारंजेकर (उपसरपंच ग्रा.पं. तांडा),रामेश्वर भगत ,जितेंद्र बिसेन ,रमेश उके (सदस्य, ग्रा.पं. तांडा),हसनसिंह सोमवंशी (पो.पा. तांडा), सुरेद्रसिंह परिहार (अध्यक्ष त.पु. समिती तांडा), डी. एम. पटले (मुख्या, तांडा),डॉ. प्रियांशी गुप्ता (एच.ओ. आरोग्य अधि., डाॅ.अमित खोडनकर,गजानन राठोड उपस्थित राहणार आहेत.स्पर्धेचा प्रथम पुरस्कार 31,001/-ट्राफी एवं प्रशस्तीपत्र,द्वितीय पुरस्कार ।। 21,001/-ट्राफी एवं प्रशस्तीपत्र,तृतीय पुरस्कार 11,001/-ट्राफी एवं प्रशस्तीपत्र व चतुर्थ पुरस्कार ।। 5,001/-ट्राफी एवं प्रशस्तीपत्र राहणार आहे.बक्षिस वितरण आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.




