
गोंदिया : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड मोठ्या चलाखीने बदलून त्याद्वारे ७० हजार रुपये खात्यातून काढून फसवणूक करण्यात आली. गोरेगाव पोलिस ठाण्यातंर्गत शहरातील एसबीआय एटीएममध्ये ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी हेतराम माघोराव बोपचे (५८, रा. शारजा लॉनजवळ, गोरेगाव) हे एसबीआयच्या एटीएममध्ये ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान पैसे काढण्यासाठी गेले होते. तेथे असलेल्या अनोळखी व्यक्तींपैकी एकाने हेतराम यांच्याकडील एटीएमची मोठ्या चलाखीने अदला-बदली करून टाकली. त्यानंतर ६ ते ७ फेब्रुवारी दरम्यान त्यांच्या खात्यातून वेगवेगळ्या एटीएममधून ७० हजार रुपये काढून घेतले. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे





