33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home मराठवाडा/खान्देश गोंडजेवली व गोंडजेवली तांडा शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात

गोंडजेवली व गोंडजेवली तांडा शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात

0
191

blank

विद्यार्थ्यांनी जिंकली ग्रामस्थांची मने

नांदेड/दि.६मार्च- किनवट तालुक्यातील गोंडजेवली व गोंडजेवली तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व सत्कार समारंभासह विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनपर नाटिका,विविध गाणी,कविता , नृत्य,तसेच विनोदी नाटिका सादर करण्यात आली.

गोंडजेवली व गोंडजेवली तांडा ची शाळा किनवट पासून६०किलो मीटर ,नांदेड जिल्ह्या पासून सुमारे१३०किमी अंतरावर महाराष्ट्र व तेलंगणा सिमेवर असणारे एक बहूभाषिक गाव आहे.वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली.हे वार्षिक स्नेहसंमेलन पाहण्यासाठी पालकांनी, शिवणी बीट व ग्रामस्थांनी तसेच विशेष करून महिलांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. उत्साहपूर्ण वातावरणात बहारदार विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमास रंगत आणली.
सुरुवात मारो देव बापू सेवालाल या गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नवीना जाधव व प्रगती राठोड या विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी साहेबांची मुलाखत घेतली.त्याबद्दल कौतुक झाले. तसेच प्रगती राठोड हिने 71 चा पाढा साहेबांच्या समोर म्हणून दाखविला. हे ऐकुन सर्व जण आवाक झाले.blank
याबरोबरच नवी व जुनी गाणी खूप छान पद्धतीने सादर झाली. या दरम्यान आजच्या काळातील शिक्षणाचे महत्व पटवुन देणारे व स्वच्छ भारत अभियान (स्वच्छते विषयीचे महत्व पटवुन देणाऱ्या) तसेच व्यसनमुक्ती अभियान या नाटिकेने धमाल उडवून दिली. भारतीय सैनिकांची आठवण करून दिली. नयनरम्य विद्युत रोषणाईने रंगमंच सजविण्यात आला होता.
वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त ज्यांनी ज्यांनी सहकार्य करणा-या सर्व पालकांचे शाल व श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनपर नाटिका,विविध गाणी,कविता , नृत्य,तसेच विनोदी नाटिका सादर करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुभाष दारिसिंग राठोड होते.तर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, तसेच सत्यनारायण कौड, उत्तम कानिंदे व प्रमुख पाहुणे कमलताई देशमुख, बालाजी आलेवार उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने म्हणाले, स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आपली गुणवत्ता टिकवून ठेवली असून स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे महत्वपूर्ण भविष्यात एखादा कलाकार निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, आम्ही तालुकास्तरीय विविध स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या प्रज्ञा, प्रतिभेचा अविष्कार फुलवीला आहे. तसेच शिक्षणा बरोबर सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सुप्तगुणांना वाव मिळाला पाहिजे असे म्हणाले. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य जिल्हा परिषद शाळा करत आहे व शिक्षकांचे कौतुक केले.

कार्यक्रमावा सर्व पालक,विद्यार्थी, पंचक्रोशीतील मुख्याध्यापक,शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन्ही नायक यांच्या वतीने सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच सुधाकर जाधव,नायक रवींद्र राठोड ,नायक बळीराम पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य व अप्पाराव पेठ,शिवणी बीट,तोंटबा, केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन धाकडे, सचिन गवळी,दिलीप वाघमारे,यांनी केले.प्रास्ताविक दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक अंबादास राठोड, राजकुमार चव्हाण,यांनी केले.तर आभार शिक्षक दिलीप वाघमारे ,यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील, पालक व माता पालकांनी तसेच ग्रामस्थांनी यांनी परिश्रम घेतले.

blank