40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ विभागीय सरस प्रदर्शनी ठरली ‘निरस’,प्रशासकीय भूमिकेचा फटका

विभागीय सरस प्रदर्शनी ठरली ‘निरस’,प्रशासकीय भूमिकेचा फटका

0
56

गोंदिया,दि.३१ मार्च : महिन्याभरापुर्वी आयोजित जिल्हास्तरीय सरस महोत्सवाच्या जनजागृतीला घेवून बचत गटाच्या महिलांसह सर्वसामान्य नागरिकांनी ग्रामीण विकास यंत्रणेविरुद्ध चांगलीच नाराजी व्यक्त केली होती.त्यातच शासनाच्या आदेशान्वये यावेळी गोंदियाला विभागीय सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सवाचे आयोजनाचे सौभाग्य लाभले.मात्र ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व व्यवस्थापकांच्या अड्डेलतट्टू धोरणाचा फटका या प्रदर्शनाला बसला आणि विभागीय सरस प्रदर्शनी ठरली ‘निरस’ ठरल्याचे चित्र उघड्या डोळ्यांनी जनतेसह प्रशासनाला बघावे लागले.परजिल्ह्यातून आलेल्या महिला बचतगटाच्या सदस्यांनी सुध्दा आयोजकांबद्दल नाराजी व्यक्त करीत काहीच व्यवसाय होत नसल्याची खंत व्यक्त केली.

विभागस्तरावरील या प्रदर्शनीपासून बचत गटाच्या महिलांनी मोठी आशा बाळगली होती. मात्र उदघाटनाच्या दुसर्या दिवशी ३० मार्च रोजी दिवशी मोहत्सवाच्या मंडपातील सुकसुकाटामुळे सहभागी झालेल्या उद्यमशील बचत गटाच्या महिलांना विक्रीची ना उमेद दिसून आले.सकाळपासून रात्रीपर्यंंत त्या मंंडपात खऱेदीकरीता पाहिजे तसा उत्साह नागरिकांचा दिसून आला नाही.जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या महिलांनीही त्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.ना दुपारच्या कार्यक्रमात ना सायकांळच्या कार्यक्रमात मंडपातील खुर्च्या भरल्या गेल्या,उलट रिकाम्याच दिसून आल्या.३० मार्च रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशिवाय एकही अधिकारी त्या सरस प्रदर्शनाच्या स्थळी दिसून आला नाही.त्यातच या आयोजनाला घेवून पुन्हा ग्रामविकास यंत्रणाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.blank
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी व सक्षन तसेच उद्यमशील बनविण्याच्या काम केले जात आहे. त्यातच बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावे व उत्पादित मालांना बाजारात वाव मिळावी, या दृष्टीकोणातून अभियानाच्या अंतर्गत प्रदर्शनी व विली महोत्सवाचेही आयोजित केले जाते. मात्र यंत्रणाच्या नाकर्तेपणामुळे सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सव फुसका बार ठरू लागले आहे. काही दिवसापुर्वी जिल्हास्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती मात्र त्या प्रदर्शनीला हवा तेवढा प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही, दरम्यान जनजागृतीचा अभावही दिसून आला.त्यामुळे बचत गटाच्या महिलांना यंत्रणेवर चांगलीच नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी देखील जनजागृतीचा अभाव असल्याचे कबूल केले होते. मात्र आगामी काळात असे होणार नाही, असे आश्वासनही दिले होते. त्यातच गोंदिया जिल्ह्याला विभागस्तरीय प्रदर्शनी आयोजनाचे सौभाग्य लाभाल, विभागस्तरावरील बचत गटाचे महिलांचे उत्पादन गोंदियाच्या प्रदर्शनीत पोहले. आज मोठ्या थाटात प्रदर्शनीचे उ‌द्घाटन झाले. एवढेच नव्हेत्तर उद्यमशील व प्रगतीशील बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र विभागीय सरस महोत्सवाच्या मंडपात मंचावरील पाहुण्यांपेक्षा त्यांच्या मार्गदर्शनाचा बोध घेणाऱ्या प्रेक्षक महिला दिसून आल्या नाही. रिकाम्या खुर्चीपुढे झालेले कार्यक्रमाने विभागीय सरस महोत्सवाचे चांगले वाभाळे काढले. त्यामुळे विभागीय सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सवाला यंत्रणाच हरताळ फासत असल्याची प्रतिक्रिया सर्वस्तरावरून उमटू लागली आहे.