27.5 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home विदर्भ आदिवासी हलबा-हलबी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी भरत घासले

आदिवासी हलबा-हलबी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी भरत घासले

0
104

– गोरेगावात आदिवासी हलबा-हलबी संघटनेची कार्यकारिणी गठित

गोरेगाव ः आदिवासी हलबा-हलबी समाज संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी पत्रकार भरत घासले यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय कार्यालय कंटगी अंतर्गत आधीलोक विद्यालय सभागृहात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय सचिव अजय कोठेवार होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून राज्याध्यक्ष वाय. सी. भोयर, नगराध्यक्ष तेजराम बिसेन, कृषी अधिकारी महेंद्र दिहारे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासमक्ष दीप प्रज्वलन करून व माल्यार्पणाने करण्यात आली. प्रसंगी संघटनेची गोरेगाव तालुका कार्यकारीणी गठीत करण्यात आली. ज्यामध्ये सर्वानुमते भरत घासले यांची अध्यक्ष पदी तर युवक अध्यक्षपदी नितेश येल्ले, महिला कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी संगीता नाईक, तर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर राऊत यांची निवड करण्यात आली. तसेच तालुका सचिवपदी स्नेहल कोठेवार, युवक सचिवपदी निलेश राऊत, महिला सचिवपदी संगीता घासले, तर कर्मचारी संघटनेच्या सचिवपदी देवेंद्र भोयर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रसंगी केंद्रीय सचिव अजय कोठेवार, राज्याध्यक्ष वाय सी भोयर व कृषी अधिकारी महेंद्र दिहारी यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटनेला बळकट करून समाजाला एकत्र करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव शिवानंद फरदे यांनी केले. यावेळी प्रामुख्याने सेवानिवृत्त तहसीलदार सी. आर. भंडारी, एस. सी. भोयर, नीलाराम नाईक, आनंद चर्चे, मोहन राऊत, केशव चवारे, झामसिंग भोयर, नामदेव नाईक, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहुल येल्ले, विजय येल्ले, बालाराम वडगावकर, खेमराज भंडारी, संजय धानगाये आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank