27.9 C
Gondiā
Saturday, July 4, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात गणना पत्रक वाटपाला वेग विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत २८.१५% प्रगती

गोंदिया जिल्ह्यात गणना पत्रक वाटपाला वेग विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत २८.१५% प्रगती

0
22

गोंदिया, दि. ४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात गणना पत्रक (Enumeration Form) वाटपाच्या कामाला गती मिळाली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून याबाबतची अद्ययावत माहिती जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) मार्फत घराघरांत जाऊन मतदारांना गणना पत्रक वितरित केले जात आहे.अधिकृत आकडेवारीनुसार, गोंदिया जिल्ह्यात एकूण ११,२३,८०५ मतदार असून, त्यापैकी ३,१६,३३८ गणना पत्रके वितरित करण्यात आली आहेत. ही प्रगती २८.१५ टक्के इतकी आहे. तसेच ७,८२८ पत्रके डिजिटाईज करण्यात आली असून, त्याचे प्रमाण २.४७ टक्के आहे.
मतदारसंघनिहाय प्रगती पाहता, आमगाव (ST) मतदारसंघात सर्वाधिक ३९.७१ टक्के वाटप झाले आहे. तिरोडा मतदारसंघात २६.७३ टक्के, अर्जुनी मोरगाव (SC) मध्ये २६.१३ टक्के, तर गोंदिया मतदारसंघात २१.३१ टक्के वाटप पूर्ण झाले आहे.जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना हे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.