गोंदिया,दि.१०ः जिल्ह्यातील गोंदिया तालुका व तिरोडा तालुक्याचे नवचेतना व आधारशीला अंतर्गत शासनाच्या आदेशान्वये प्रथम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रवीण प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 10 जुलै 2026 रोजी पर्यवेक्षिका व डेमो अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका यांचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.
यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनित चंद्रा दोन्थुला,जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभागाचे कीर्तीकुमार कटरे,पं.स.गोंदिया सभापती मुनेश रहांगडाले,पंचायत समिती गोंदियाचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे,सहायक गटविकास अधिकारी मोकिंदा देडगे, प्रियंका किरणापुरे व विनोद कुमार चौधरी बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच प्रथम फाउंडेशनचे विभाग प्रमुख गजानन सरोदे, जिल्हा समन्वयक जितेंद्र कोटांगले,उपस्थित होते.
प्रशिक्षण प्रामुख्याने तीन भागात घेण्यात आले स्वागत मेळावा बाल मेळावा व प्रशिक्षण. या प्रशिक्षणाचा फायदा अंगणवाडीतील balkanchi शैक्षणिक गुणवत्ता वाढ, NEP 2020 अंतर्गत अंगणवाडीच्या शिक्षणामध्ये सहभाग, अंगणवाडीच्या बालकांचा व पालकांचा अधिक सहभाग, शाळा पूर्वतयारीची बालकांमध्ये जागरूकता वाढेल.कार्यक्रमाच्या वेळी आदरणीय झेनित चंद्रा दोन्थुला, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले तसेच सभापती पंचायत समिती गोंदिया यांनी सुद्धा प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाची प्रस्तावना विनोदकुमार चौधरी बालविकास प्रकल्प अधिकारी तिरोडा यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रियंका किरणापुरे बालविकास प्रकल्प अधिकारी गोंदिया 2 यांनी केली. प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन उषा आगाशे अंगणवाडी पर्यवेक्षकांनी केले.प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी कुसुम सिरसाम विस्तार अधिकारी सांख्यिकी तसेच पर्यवेक्षिका व मदतनीस यांनी सहकार्य केले.




