25.2 C
Gondiā
Monday, July 13, 2026
Home विदर्भ राममंदिर चंदा चोरीविरूध्द शिवसेना (उबाठा) चे आंदोलन

राममंदिर चंदा चोरीविरूध्द शिवसेना (उबाठा) चे आंदोलन

0
7

नवेगावबांध : राम मंदिर चंदा चोरीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गोंदिया जिल्ह्याच्या वतीने मौजा कालीमाटी- हनुमान मंदिर (गोठणगाव-सुकडी) येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध कालीमाटी हनुमान मंदिर परिसरात (गोठणगाव – सुकडी रोड) प्रभु हनुमंताची महाआरती करून व चंदा चोरांचे जाहीर निषेध करत ‘सामान्यांचे राज्य यावे’ अशी घोषणा देत हे आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना (उ. बा. ठा.) जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल यांच्या खंबीर नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रभु हनुमंताला साकडे घातले.
या आंदोलनाप्रसंगी उपजिल्हा प्रमुख राजू पटले, तालुका प्रमुख मोरेश्वर सोंदरकर, तालुका महिला संघटिका अर्चना देशमुख, तालुका संघटक नरेश
बोटकर, शहर प्रमुख उइके, किरण शेंडेवार, मुकेश उइके, तसेच युवासेना उपमहिलाप्रमुख कार्तिक पटले, युवासेना तालुकाप्रमुख सोमराज कोल्हे, उपप्रमुख राहुल गुप्ता, युवासेना नवेगाव शाखाप्रमुख टेकचंद शाहू, शिवसेना शाखाप्रमुख मुकेश धारवेकर, बबन बडवाईक, सुशिल गहाणे, सुधाकर बोटकर, नानाजी शेंडे, श्याम भाजीपाले, रमेश लांडकर, माधव डोंगरवार, मोहन कोडापे, भुलाराम मांडवे, तिरिथराम हलधर, सुजित मिश्रा, संतोष राठोड, घनश्याम कापगते, जितेंद्र पवार, रवि मेश्राम, अनिल झिंगरे, श्रीराम मुंडलेकर आदींसह बहुसंख्य संख्येने शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.