25.9 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ गोर बंजारा परिवार गोंदियातर्फे दहा दिवसीय तीज उत्सवाला उत्साहात सुरुवात

गोर बंजारा परिवार गोंदियातर्फे दहा दिवसीय तीज उत्सवाला उत्साहात सुरुवात

0
5

गोंदिया : गोर बंजारा परिवार गोंदिया यांच्या वतीने आजपासून पारंपरिक दहा दिवसीय तीज उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या उत्सवात महिला भगिनींसह पुरुष मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.गोर बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा, लोककला, लोकगीते आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येते. दहा दिवसांच्या या उत्सवात दररोज वेगवेगळ्या कुटुंबांच्या घरी जाऊन पारंपरिक लोकगीते व नृत्याच्या माध्यमातून तीज उत्सव साजरा केला जाते.

या लोकगीतांमधून संत सेवालाल महाराज, माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक तसेच गोर बंजारा समाजातील विविध महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना उजाळा दिल्या जाते. त्यामुळे नव्या पिढीला आपल्या समाजाचा इतिहास, संस्कृती आणि महान व्यक्तिमत्त्वांची ओळख होण्यास मदत होते.विशेषतः अविवाहित मुलींसाठी तीज उत्सवाला विशेष महत्त्व असून, त्यांच्या सहभागातून पारंपरिक संस्कृती आणि लोकपरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या उत्सवातून केले जाते.