23.6 C
Gondiā
Friday, September 4, 2026
Home गुन्हेवार्ता प्रतापनगरात ५२ ग्रॅम गांजासह १.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतापनगरात ५२ ग्रॅम गांजासह १.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
32
अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची कारवाई; दोघे ताब्यात
नागपूर : प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने नशेविरोधी कारवाई करत दोन युवकांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी १३ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आणि ३९ ग्रॅम गांजा, असा एकूण ५२ ग्रॅम गांजा जप्त केला.आरोपींकडून गांजासह मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक मोपेडही जप्त करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत एकूण १ लाख ८७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.नशेच्या पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असून, या प्रकरणातील पुढील तपास अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सकडून करण्यात येत आहे.