25.8 C
Gondiā
Sunday, September 6, 2026
Home गुन्हेवार्ता पान सेंटर फोडून १ लाख ८० रुपयांची हजारांची चोरी

पान सेंटर फोडून १ लाख ८० रुपयांची हजारांची चोरी

0
6

आमगाव -शहरातील बाजार चौक परिसरात पान सेंटरचे शटर फोडून तब्बल १ लाख ८० हजार रुपये रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा आमगाव पोलिसांनी छडा लावला आहे. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी परजिल्ह्यात जाऊन अत्यंत शिताफीने तपास करत एका आरोपीसह दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी (दि. ३) करण्यात आली.
आरोपींकडून चोरीची १ लाख ८० हजार रुपयांची संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात आली असून, एका विधी संघर्ष बालकाकडून चोरीच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली अंदाजे ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात कलम ३०५, ३३१ (४) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण राधेश्याम मेंढे (वय ३१), रा. बनगाव, ता. आमगाव, जि. गोंदिया यांचे आमगाव बाजार चौक परिसरात पान सेंटरचे दुकान आहे. २७ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ७.४० वाजता ते २८ ऑगस्ट रोजी पहाटे ५.४८ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून आत रोकड लंपास केली. यामध्ये पान सेंटरमधून १४ हजार रुपयांची रक्कम, तसेच घराच्या बांधकामासाठी ठेवलेली १ लाख ६६ हजार रुपयांची रोकड, अशी एकूण १ लाख ८० हजार रुपये रक्कम चोरीला गेली.
तांत्रिक तपासाने आरोपींचा माग काढला
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक निलकंठ कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. तपास पथकाने परजिल्ह्यात जाऊन गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. अखेर पोलिसांना या चोरीच्या प्रकरणात एका आरोपीसह दोन विधी संघर्ष बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.