27.1 C
Gondiā
Thursday, September 10, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन 12 सप्टेंबरला

राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन 12 सप्टेंबरला

0
9

गोंदिया, दि.10 : सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.

जिल्हा न्यायालयासह गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच अन्य न्यायालये व न्यायाधिकरणांमध्ये लोक अदालतीचे आयोजन केले जाणार आहे. लोकअदालतीत तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणांसह मोटार अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, महसुली प्रकरणे, वैवाहिक बाद, बँका व वित्तीय संस्थांशी संबंधित वसुलीची प्रकरणे तसेच अन्य प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढता येणार आहेत. वाद मिटविण्यासाठी न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकत्यांचे मंडळ पक्षकारांना मदत करणार आहे.

प्रलंबित तसेच दाखलपूर्व तडजोडीस पात्र प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश आर.जी. वाघमारे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एम.आर. बोरकर यांनी केले आहे.