
मुंबई, दि. 9 : अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत, राज्यातील प्रत्येक उपविभागीय स्तरावर दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता नियंत्रण समितीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. 11 मार्च 2015 रोजी झालेल्या बैठकीत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपविभागीय दक्षता नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी हे असतील.सदस्य पोलीस उप अधिक्षक, अनु. जाती व जमातीचे पंचायत समिती सदस्य,तहसीलदार (उपविभागाअंर्तगत सर्व तालुक्यातील तहसीलदार), अनु. जाती जमातीचे सामाजिक कार्यकर्ते (दोन), अनुसूचित जाती जमातीचे अशासकीय संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते (दोन), केंद्र शासनाने नामनिर्देशित केलेले सामाजिक कार्यकर्ते (तीन), गटविकास अधिकारी, पंचायत समिती उपविभागीय स्तर वगळून, सदस्य सचिव म्हणून, गटविकास अधिकारी पंचायत समिती ( उपविभागीय स्तरावरील) हे या समितीवर असतील.