33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ सीईओ ठाकरेंनी केली देवरी तालुक्यातील कामांची पाहणी

सीईओ ठाकरेंनी केली देवरी तालुक्यातील कामांची पाहणी

0
22

देवरी,दि.23 : जि.प. गोंदियाच्या मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून नुकतेच रुजू झालेले रवींद्र ठाकरे यांनी संपूर्ण जिल्ह्यातील प्रवास सुरू केला. दरम्यान त्यांचा देवरी तालुक्यातही प्रवास झाला. यावेळी तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील प्रत्येकी कामाची पाहणी केली.प्रथम तालुक्यातील आंभोरा येथील गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ केला. जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर, उपविभागीय अभियंता गोवर्धन बिसेन, नायब तहसीलदार बारसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हुमने, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता एस.यु. कटरे, आर.एन. हुमने, ताकसांडे, सरपंच सौ. ज्योति धानगाये, सदस्य नामदेव सोनटक्के, देवेंद्र घरत, विना साखरे, भाग्यश्री सोनटक्के आदी उपस्थित होते.
यावेळी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, यांनी शासनाच्या गाळ युक्त शिवार या योजनेत प्रत्येक नागरिकांनी यामध्ये यामध्ये श्रमदानाने सहकार्य करून तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करून पाण्याचासाठा जास्त प्रमाणात संग्रहित कसा होईल यावर मार्गदर्शन केले. गाळ मुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ होताच मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी तालुक्यातील आलेवाडा, येथील मनरेगा अंतर्गत पाईल पुलिया, सिमेंट रोड, पलानगाव येथील प्रधानमंत्री गोठा, फुटाना, येथीले प्राथमिक आरोग्य केंद्र, डास मुक्त गाव य अभियानातील शेष खड्डे, तलाव खोलीकरण आदी शासकीय कामाची पाहमी करण्यात आली. यावेळी मुकाअ ठाकरे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना जि.प. अंतर्गत असणार्‍या सर्व शासकीय योजनांची माहिती प्रसिद्ध फलकाद्वारे प्रसिद्ध करून जनतेपर्यंत त्या कशा पोहचविल यावर प्रयत्न करण्याचे आदेश दिले. ऐवढेच नाही तर आपण एका विशिष्ट तालुक्यात काम करीत आहोत आणि येथील नागरिकांना आपण किती चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो यावर सुद्ध लक्ष देण्याची आवश्यकता आहे. असेही ते बोलले.
यावेळी मुकाअ ठाकरे यांच्या सोबत दिनबंधू ग्रामीण संस्था देवरीचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार उपस्थित होते. यावेळी त्यांशी संवाद साधून तालुक्यातील समस्या यावर चर्चा करून त्यावर उपाययोजना काढण्याविषयी चर्चा झाली. यावेळी पंचायत समितीचे अभियंता बैस, मडावी, खोब्रागडे, बांधकाम, विभागाचे फुले, विस्तार अधिकारी पराते, मनरेगा चे कृषी तंत्र सहाय्यक संजय डोये, अभियंता बिसेन, नंदेश्‍वर, ग्रामसेवक कटरे आदी उपस्थित होते.