42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home महाराष्ट्र फुंडकरांची 35 पैकी 11 मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

फुंडकरांची 35 पैकी 11 मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

0
25

blank

मुंबई दि. 29 –: राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री बैठकीला शतप्रतिशत उपस्थित असतात. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर हे दांडीबहाद्दर मंत्र्यांमध्ये अव्वल आहेत. तर टॉप 5 मंत्र्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर-पाटील, राजकुमार बडोले यांचाही समावेश आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठकी आणि मंत्र्याची उपस्थितीची माहिती मागितली होती. मुख्य सचिव कार्यालयाने दिलेल्या माहितीतून ही माहिती समोर आली आहे.17 जुलै 2016 पासून 22 मे 2017 या कालावधीत एकूण 35 मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता 22 च्या 22 मंत्र्यानी दांडी मारली. या दांडी बहाद्दरांमध्ये कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अव्वल क्रमांक पटकावत 35 पैकी 11 वेळा अनुपस्थित होते.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही 9 वेळा अनुपस्थित राहत दुसरा क्रमांक पटकवला. यानंतर ग्रामविकास आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि कामगार मंत्री संभाजी निलंगेकर-पाटील हे तिघे प्रत्येकी 8 वेळा अनुपस्थित होते.

blank