41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News मुझफ्फरनगर-पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 6 डबे रूळावरून घसरले

मुझफ्फरनगर-पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 6 डबे रूळावरून घसरले

0
21

blank

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.19 मुझफ्फरनगर-पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 6 डबे रूळावरून घसरले आहेत. खौताली स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी घडली आहे. घटनास्थळी सध्या पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या घटनेमुळे मेरठ-अंबाला-सहारनपूर मार्ग बाधित झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचे आणि NDRF चे तसेच उत्तर प्रदेशचे दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. एक्स्प्रेसचे सहा पैकी दोन डबे एकमेकांवर चढले आहेत. मेरठ- मुजफ्फरनगर दरम्यान खतौली हे ठिकाण आहे. यातील एक डबा रेल्वे रुळालगतच्या घरात घुसल्याचेही सांगण्यात येत आहे. जखमींचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत. या घटनेमुळे मेरठ-अंबाला-सहारनपूर मार्ग बाधित झाला आहे.

blank