32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ आमगाव खुर्दमध्ये एकही अर्ज नाही,प्रशासन नापास

आमगाव खुर्दमध्ये एकही अर्ज नाही,प्रशासन नापास

0
20

गोंदिया,दि.30 : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने आॅनलाईन केंद्र, तहसील आणि उपविभागीय कार्यालयात नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी उसळल्याचे चित्र होते.त्यातच आधीपासूनच सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द ग्रामपंचायतीने नगरपंचायतीमध्ये सहभागी करुन घेण्याच्या मुद्याला घेऊन बहिष्काराचे आवाहन केले होते.त्यासाठी मोर्चा काढून चौकाचौकात निषेधाचे प्रतिकात्मक पुतळेही बसविले होते.त्या सर्वबाबीकडे तालुका प्रशासन व जिल्हा निवडणुक विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे कुठलीही चर्चा न झाल्याने व राज्यसरकारपर्यंत नागरिकांच्या भावना न पोचविल्याने एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.त्यामुळे या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीमध्ये सहभागी करुन घ्या ही नागरिकांची मागणी वरचढ ठरली आहे.गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथे काँग्रेससोबत भाजपच्या एका गटाने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र आल्याचे सांगत युती केली आहे.यामध्ये तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डेमेंद्र रहागंडाले व भाजपचे तेजेंद्र हरिणखेडे यांनी युती केली आहे.तर दुसरा गट हा राष्ट्रवादीसोबत गेल्याची चर्चा आहे.तिरखेडी य़ेथे ओबीसी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी मनोज शरणागत यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जिल्ह्यातील ३४७ सरपंच आणि २ हजार ९३९ सदस्य पदांसाठी १६ आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ आॅक्टोबरपासून सुरूवात झाली. निवडणूक आयोगाने यावर्षीपासून नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांची चांगलीच अडचण होत आहे. त्यामुळेच सुरूवातीच्या पाच सहा दिवसांत केवळ २१० नामाकंन अर्ज दाखल झाले होते. गुरूवारपासून नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची केंद्रावर गर्दी वाढत असल्याचे चित्र होते.
गुरूवारी सर्व केंद्रांवर सरपंच पदासाठी २२७ तर सदस्य पदासाठी ९७० नामाकंन अर्ज दाखल झाले होते. तर शुक्रवारी सकाळी १० वाजतापासूनच जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी गर्दी केली होती. नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. त्यामुळे नेमक्या किती उमेदवारांनी शुक्रवारी नामाकंन अर्ज दाखल केले याची माहिती कळू शकली नाही.