33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News राजस्थानचे गृहमंत्री कटारिया यांना स्वाइन फ्लू

राजस्थानचे गृहमंत्री कटारिया यांना स्वाइन फ्लू

0
25

blank

जयपूर- राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना स्वाइन फ्लू झाला असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (मंगळवार) दिली.

कटारिया व त्यांची पत्नी अनिता यांना सर्दी व ताप आल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदर्शनास आले. उदयपूरमधील एमबी चिकित्सालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉ. महेश दवे म्हणाले, ‘गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना स्वाइन फ्लू झाला आहे. मात्र, अनिता कटारिया यांना स्वाइन फ्लू झालेला नाही. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.‘

दरम्यान, राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात स्वाइन फ्लूमुळे आजपर्यंत 58 जणांचा मृत्यू झाला आहे.

blank