
रायगड,दि.22(विशेष प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीतेच्या गाडीचा खोपीलीजवळ अपघात शुक्रवारी झाला. या अपघातात अनंत गीते किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ एका पायलट कारची धडक अनंत गीते यांच्या गाडीला बसली. या घटनेत अनंत गीते यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





