मुुंबई,दि.08 – किसानपुत्र आंदोलनाच्या नागपूर शिबिरात झालेल्या चर्चेनंतर शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनमंच या व्यासपीठाने 6 व 7 जानेवारी 18 रोजी हे शिबीर आयोजित केले होते.या शिबिरात ऍड. सुभाष खंडागळे, मकरंद डोईजड, प्रमोद चुंचुवार यांनी याविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली. विधान सभेचे माजी उपाध्यक्ष ऍड. मोरेश्वर टेभुंर्डे व जेष्ठ विधिज्ञ ऍड. अनिल किलोर यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.मकरंद डोईजड व अनंत देशपांडे वेगवेगळ्या दोन याचिका दाखल करणार असल्याने महाराष्ट्रातील सर्व किसानपुत्रांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यासाठी मोठा खर्च असल्याने या ऐतिहासिक कामासाठी जी आर्थिक मदत लागेल ती आपण सर्व मिळून उभी करू अशा निर्णय घेत. ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी अमर हबीब, किसानपुत्र आंदोलन. [email protected], मो.8411909909 यावर संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.




