40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता ४२ तोळे सोने घेऊन चोरटे पसार

४२ तोळे सोने घेऊन चोरटे पसार

0
34

तुमसर,दि.23-एटीएम मशिन फोडून गोळीबार करणार्‍या चोरट्यांनी पोलिसांना घाम फोडला असतानाच आता प्रसिद्ध व्यापार्‍याच्या घरातून तब्बल ४२ तोळे सोने व एक लाख रुपये चोरून नेल्याच्या घटनेने तुमसर पोलिसांची लख्तरे वेशीला टांगल्या गेली आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहर पुन्हा हादरले आहे. सुरेश दौलतराम छतानी रा. गोवर्धन नगर तुमसर असे या व्यापार्‍याचे नाव आहे.
सुरेश छतानी हे शुक्र वारी आपल्या कुटुंबासह रायपूर येथे गेले होते. शुक्र वारपासून त्यांचे घर कुलूपबंद होते. रविवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. रात्री १0.३0 वाजता त्यांच्या घराच्या मागे राहणार्‍या शेजार्‍यांना घरात काहीतरी पडल्याचा आवाज आला होता. परंतु, घरात मांजर असल्याचे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. चोरट्यांनी छतानी यांच्या बाथरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले ४२ तोळे सोने व एक लाख रुपये असा एकूण ११ लाख ५0 हजारांचा मुद्देमाल लुटला. रात्री १२.५0 वाजताच्या सुमारास छतानी कुटुंबिय रायपूरवरून परत आले. त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येताच चोरटे पसार झाले.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच छतानी यांनी तुमसर पोलिसात तक्र ार केली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला. परंतु, ते सापडले नाहीत. रात्री १ वाजताच्या सुमारास जुन्या बसस्थानकाजवळ चार व्यक्ती हजर होते, त्यांची वागणूक संशयास्पद होती, अशी माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे ते चोरटेच असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अधिक तपास सुरू आहे.

blank