31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गडचिरोली नगर परिषदेच्या विषय समित्यांमध्ये खांदेपालट

गडचिरोली नगर परिषदेच्या विषय समित्यांमध्ये खांदेपालट

0
22

गडचिरोली, दि.२३: येथे आज झालेल्या नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीत भाजपने खांदेपालट करुन नव्या नगरसेवकांना संधी दिली.आज दुपारी २ वाजता उपविभागीय अधिकारी नितीन सदगिर व मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांच्या उपस्थितीत गडचिरोली नगर परिषदेच्या सभागृहात नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. प्रत्येक विषय समितीच्या सभापतिपदासाठी प्रत्येकी एकच नाव असल्याने सर्वांची निवड अविरोध झाली. बांधकाम समितीच्या सभापतिपदी ज्येष्ठ नगरसेवक व विद्यमान सभापती आनंद शृंगारपवार यांची पुनर्निवड करण्यात आली. वित्त व नियोजन समितीचे सभापती म्हणून ज्येष्ठ नगरसेवक संजय मेश्राम यांची निवड झाली. पाणीपुरवठा समितीचे सभापती म्हणून प्रवीण वाघरे, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, महिला व बालकल्याण सभापती म्हणून रंजना गेडाम यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्याकडे आरोग्य समितीचे सभापतिपद कायम ठेवण्यात आले. स्थायी समितीच्या सदस्यपदी नगरसेवक भूपेश कुळमेथे, मुक्तेश्वर काटवे व प्रशांत खोब्रागडे यांची निवड झाली.

यानंतर आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, डॉ.भारत खटी, रवींद्र ओल्लालवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर आदींनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.