37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News कोंबड बाजारावर नक्षल्यांचा गोळीबार

कोंबड बाजारावर नक्षल्यांचा गोळीबार

0
40
file photo

blank

गडचिरोली,दि.31 – जंगल परिसरात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर नक्षल्यांनी गोळीबार केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज ३१ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथे घडली.इरप्पा उसेंडी (३५) रा. अबनपल्ली असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील जंगल परिसरात आज कोंबड बाजार भरविण्यात आला होता. या कोंबड बाजारात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान दुपारच्या सुमारास बाजार परिसरात बंदुकधारी नक्षली आले. त्यांनी अंदाधूंद गोळीबार सुरू केला. गोळ्यांचा आवाज ऐकून बाजारामधील नागरिक सैरावैरा पळू लागले. याचदरम्यान नक्षल्यांनी इरप्पा उसेंडी याच्यावर निशाना साधत त्याला गोळी मारली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नक्षली घटनास्थळावरून जंगलात पसार झाले.
इरप्पा उसेंडी नक्षल्यांच्या निशान्यावर होता. नक्षली मागील काही दिवसांपासून इरप्पा उसेंडीच्या मागावर होते. याचदरम्यान आज कोंबड बाजारात आलेल्या इरप्पाची नक्षल्यांनी गोळी मारून हत्या केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

blank