
प्रेमदिवसाला काही संस्कृती रक्षक आतापासून आपल्या बाह्य सरसावून बसले असतील तर काहींना शहाणपण आलं आहे एवढी मोठी युवाशक्तीची व्होटबँक आपल्या हातून जाणार म्हटल्यावर शहाणपण येणारच हो अर्थात व्होटबँक हे राजकारण्याच पहिल प्रेम असतं नाही का. असो. प्रेम व्यक्त करण्यास बहुतेक जण घाबरत असतात यात मार पडेल, अपमान होइल ही भावना कमी तर नकार मिळाला तर ही अपराधाची भावनाच जास्त असते. प्रत्येकाच्या मनात ही सुप्त ईच्छा असते की आपल्यावरही कोणीतरी प्रेम करणारं असावं कारण
‘‘छोट्याश्या चोरीनंतरही बरीच
आरडाओरड होत असते
पण आपल हदय कोणीतरी चोरावं
अस प्रत्येकालाच वाटत असते’’
प्रेम हया भावनेतून गेलेला माणूष्य प्राणी हा भूतलावर सापडणे कठीण.
‘‘पहिलं प्रेम हे नादान असतं
अस मी ऐकल आहे
पण तेच तर खरं प्रेम असतं
अस कोणीतरी म्हटलं आहे’’
कारण पहिली नोकरी, पहिला पगार, पहिले प्रेम, पहिली किस, पहिला गेम कोणीच विसरत नाही. बरोबर ना. आम्हाला तर प्रेम म्हणजे काय रसायन असत हे तर कॉलेज मध्ये गेल्यावर ते पण रोझ डे च्या निमित्ताने कळले तस शालेय जीवनात आकर्र्षण होतच आणि आजकाल पाचवीच्या विद्यार्थीचे ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात (प्रेम किती रसातळाला गेले पहा शब्दांशा अर्थ घेउ नये) आणि हो तुम्हाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नसल्यास तुम्ही मागासलेले (विचारांने) ठरविलेले जातात. तर काही महाभाग असतात ज्यांना दोन तीन प्रकरणातून तोलूनसोकाउ गेल्याशिवाय प्रेम म्हणेज काय हे कळतच नाही.
‘‘प्रेम आयुष्यात एकदाच होत
आणि जेव्हा ते वारंवार होत
तेव्हा ते प्रेम प्रेम राहतच नाही
ते तर लफड होऊन जात’’
त्यात भरीस भर मोबइल, इटरनेट, केबल टिव्हीने प्रेमाला भलत्याच उंचीवर नेवून ठेवले.
जगतिकरणाचे वारे आता प्रेमातही वाहू लागले आहेत काल परवापर्यत चोरुन, चोरुन भेटणारे ती आणि तो आजकल बिनधास्तपणे डेटिंगला जावू लागले आहेत मोबइल, इंटरनेट, केबल टिव्हीमुळे घरबसल्या आपल्याला दुनियेशी ओळख झाली पण या दुनियादारीतून आपण चांगल्या गोष्टी फार कमी आणि वाईट गोष्टी लवकर शिकलो.महाविद्यालये, उद्याने आणि पर्यटनस्थळे अशा ठिकाणी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जात असल्याने काही राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला. त्यामुळे हा दिवस थोडा चर्चेत आला. मात्र, प्रेम करणाNयांसाठी वर्षाचे ३६५ दिवस व्हॅलेंटाइन डे असतो. त्यामुळे येणारा व्हॅलेंटाइन हटके स्टाइलने साजरा करायचा असेल तर जरा डोक्याला ताण द्या. या व्हॅलेंटाइनला तुमचा व्हॅलेंटाइन कोणीही होऊ शकतो. कारण प्रेम हे कोणावरही करता येते, मग ती निर्जीव वस्तू का असेना. आवडती गाडी, आवडता शिक्षक, आवडते पुस्तक, आपले शहर, गाणी, नाटक, सिनेमा, तुमची डायरी किंवा पाळीव प्राणी या सगळ्या आपल्या वाटणाNया गोष्टी व्हॅलेंटाइन होऊ शकतात. आई, बाबा, ताई, आजी-आजोबा ही तर हक्काची माणसं. खूप दिवसांपासून मनात राहिलेली गोष्ट तुम्ही या निमित्ताने त्यांच्याशी बोलू शकता. हा व्हॅलेंटाइन डे खास आपल्या ब्रेकअप झालेल्या मित्र आणि मैत्रिणींसाठीही राखीव ठेवू शकता. त्यांच्या मनात रुतलेले फस्ट्रेशन कायमचे दूर करून टाका. नेहमी रागावणाNया शिक्षकांना प्रेमाचे दोन शब्द स्वत:हून जाऊन बोला. वाहनांनी उडवलेली धूळ अंगावर घेणाNया ट्रॅफिक पोलिसांसोबतही तुम्ही हा प्रेमाचा दिवस साजरा करू शकता. विषय फक्त एवढाच आहे, तुम्ही तुमचे प्रेम कशात शोधत आहात.
दुष्काळामुळे सर्वत्र ओसाड परिस्थिती असली तरी तरुण मनात अजूनही हिरवळ पसरलेली असणार हे निश्चित. या छोट्या, छोट्या आनंदातूनच एक हॅपी आयुष्य बहरते. त्यामुळे हा दिवस कसा अविस्मरणीय बनवता येईल, याची काळजी घ्या
‘‘पाश्चात्य संस्कृतीचे स्तोम
आपल्यावर एवढं वाढू लागले आहे
की प्रेमासारख्या नाजुक नात्यालाही
लोक आता लफडं म्हणू लागले आहे’’
शेवटी एढवचं म्हणेनप्रेमाच्या व्याख्या ज्याने त्याने आपल्या सोयीप्रमाणे बनविल्या आहेत कोणी त्याला पुजा म्हणतो तर कोणासाठी प्रेम म्हणजे त्याग आहे अर्थात हया व्याख्या म्हणजे त्यांना आलेल्या अनुभवांच्याच एक भाग आहे.
तुझ्या माझ्या प्रेमाची
गावभर आहे चर्चा
सांग सखे तुझ्या
घरावर कवा आणू मोर्चा
उदय चक्रधर,गोंदिया




