31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ सरांडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

सरांडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

0
38

तिरोडा: तिरोडा तालुक्यातील सरांडी जिल्हा परिषद क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सरांडीच्या प्रगती हायस्कूलच्या प्रांगणात पार पडला.
अध्यक्षस्थानी राकाँचे जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर होत्या. मार्गदर्शक म्हणून आ. राजेंद्र जैन उपस्थित होते.याप्रसंगी तालुकाध्यक्ष छबीलाल पटले, महिला तालुका अध्यक्ष माया पडोळे, प्रेम रहांगडाले, डॉ. सुशीलकुमार रहांगडाले, चुन्नीलाल पटले, सरपंच शोभा कांबडी, माणिक वाणी, नाशिर कुरेशी, डोमळे, विठ्ठलप्रसाद पारधी, नत्थू बावणकर, पाटील, बबन कुकडे, चंद्रशेखर चौधरी, भूमी मलेवार, बिसेन, जांगडे, कापसे, अनिल बावणकर, राजेश तुरकर, थानसिंग हरिणखेडे व इतर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक रामसागर धावडे यांनी केले. भाजप व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पंचम बिसेन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांना शाल व श्रीफळ देवून आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर आ. जैन यांनी पक्ष संघटन बळकट करून जि.प. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. संचालन राजधर मलेवार, आभार चंद्रशेखर मलेवार यांनी मानले.