35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Featured News देश-विदेशी पर्यटकांनी लुटताहेत मनमुराद आंनद

देश-विदेशी पर्यटकांनी लुटताहेत मनमुराद आंनद

0
24

blank

उदयपूर- होळी सण दोन दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील श्रीजी प्रभु मंदिरात होळीचे रंग उधळले जात आहेत. देशातील नव्हे तर विदेशातील पर्यटक येथे होळीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी दाखल होता. यंदा देखील विदेशी पर्यंटक उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत.फाल्गुन शुक्ल पक्षातील त्रयोदशीला श्रीजी प्रभु मंदिरात होळी उत्सवाचे आयोजन केले जाते. श्रीचरणी लाल मीनाचे नूपुर धरले जातात. श्रीजी प्रभुला केसरी वस्त्र परिधान केले जातात.

तिलकायत राकेश महाराज यांनी आरती केली. श्रीजी प्रभुच्या मंदिरात उत्साही वातावरण पसरले आहे. गुलाल, अबीरचा सुगंध सर्वत्र दरवळतोय. ढोल ताशांच्या निनादात तरुणाई नृत्य करत आहे. यासोबत ठाकुरजी मंदिरातही होळी साजरी करण्‍यात आली. यात होळी नृत्य, स्वांग नृत्य, सखी नृत्य सादर करण्‍यात आले.

blank