37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News RBIचे गव्हर्नर रघुराम राजन यांना इसिसची धमकी ?

RBIचे गव्हर्नर रघुराम राजन यांना इसिसची धमकी ?

0
36

blank

मुंबई–भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या नावावरुन राजन यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीसांच्या माहितीनूसार, [email protected] या मेल आयडीवरून राजन यांना धमकीचा मेल पाठविण्यात आला आहे. मला तुम्हाला मारण्यासाठी कोणीतरी पैसे दिले आहेत. मात्र, तुम्ही त्यापेक्षा जास्त पैसे द्यायला तयार असाल तर, आपण याबाबत विचार करू शकतो, असा मजकूर या ई-मेलमध्ये लिहण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला राजन यांना अशाप्रकारची धमकी मिळाल्याच्या वृत्ताला मुंबई पोलीसांनी दुजोरा दिला आहे.isis (इसिस) हा उल्लेख इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया या दहशतवादी संघटनेसाठी केला जातो. त्यामुळे हा ईमेल इसिसकडून पाठवलेला अशावा असा अंदाज वर्तवला आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रघुराम राजन यांना धमकीचा मेल आल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे असे मारिया यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या तपासात हा मेल आयडी १० वेगवेगळ्या देशांमधून चालवला जात असल्याचे समोर आले आहे.

blank